Ad will apear here
Next
प्रभाग स्वच्छतेसाठी नागरिक, नगरसेवक आले एकत्र
नागरिक आणि नगरसेवकांच्या समन्वयातून घंटागाडीची व्यवस्था
तळोदा : कोणत्याही ठिकाणचा लोकप्रतिनिधी विधायक दृष्टिकोन ठेवणारा असेल, तर त्या भागातील नागरिक सुखी राहतात. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना असाच काहीसा सुखद अनुभव घेता आला. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रभागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव आल्याने या प्रभागातील नागरिक आणि नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू केली आहे.

तळोद्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेले अनेक दिवस कचरा उचलला जात नव्हता. त्यामुळे घाणीचे साम्राज्य झाले. दुर्गंधी पसरली. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आरोग्याधिकारी या सर्व स्तरांवर तक्रारी केल्या. वेळोवेळी पाठपुरावादेखील केला; पण त्याची दखल घेतली गेली नाही. काही उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यावर नागरिक आणि नगरसेवक यांच्या समन्वयातून प्रभागासाठी नवीन घंटागाडी तयार करण्याची संकल्पना समोर आली. सर्वांनी मिळून घंटागाडी तयार केली.

कचरा संकलनासाठी प्रभागातील एका गरजू महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागातील प्रत्येक घरातून एक रुपया दररोज गोळा केला जाणार असून, त्यातून संबंधित महिलेचा पगार दिला जाणार आहे. वाहन, वाहतूक याचा सर्व खर्च प्रभागातील नगरसेवकांनी उचलला आहे. हितेंद्र क्षत्रिय आणि अनिता परदेशी हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. 

सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटातील नगरसेवक या प्रभागात असल्यामुळे तेथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न देण्याची पार्श्वभूमी या प्रकरणाला आहे; मात्र प्रभागातील नगरसेवकांचा विधायक दृष्टिकोन आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यातून राजकारणी लोकांना सकारात्मक दृष्टी कशी मिळू शकते, याची एका छोट्या पालिकेतील ही कथा आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZJKBS
Similar Posts
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान - अस्तंबा डोंगर नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात असलेले अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत असलेले चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील चिरंजीव अश्वत्थाम्याचे हे स्थान असल्याचे मानले जाते.
‘शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे’ नंदुरबार : ‘भारताला व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करावयाचे असेल, तर शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बियाणे सुधार प्रयत्नांना सहकार्य करावे,’ असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
पाडळपूर येथे शैक्षणिक साहित्य मेळावा नंदुरबार : गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात गणित सप्ताह साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने तळोदा तालुक्यातील पाडळपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमार्फत गणित विषयाचा शैक्षणिक साहित्य मेळावा घेण्यात आला.
‘त्यांनी’ बांधल्या एसटी कर्मचाऱ्यांना राख्या नंदुरबार : राज्याच्या गावागावात सेवा पुरविणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नंदुरबारमध्ये अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘संस्कार संचित’तर्फे २६ ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी एसटी बसचे वाहक व चालकांना राख्या बांधल्या. या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language